esakal | विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंच्या खांद्यावर पक्षाने टाकली मोठी जबाबदारी
sakal

बोलून बातमी शोधा

विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंच्या खांद्यावर पक्षाने टाकली मोठी जबाबदारी

नुकतीच बिहारची निवडणूक पार पडली. बिहारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश देखील मिळवलंय

विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंच्या खांद्यावर पक्षाने टाकली मोठी जबाबदारी

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : नुकतीच बिहारची निवडणूक पार पडली. बिहारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश देखील मिळवलंय. मागील खेपेच्या तुलनेत भाजपाची आकडेवारी यंदा चांगलीच सुधारली आहे. बिहार निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील नेत्याचं मोठं योगदान राहिलं. महाराष्ट्राचे विरोधीपक्ष  नेते देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक झालेली. त्यामुळे बिहारच्या विजयात फडणवीसांचंही महत्त्वाचं योगदान राहिलंय. 

याच पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रोय नेतृत्त्वाने भाजपचे महाराष्ट्रातील नेत्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. भारतीय जनता पक्षाकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि सुनील देवधर यांची नावे आहेत.

महत्त्वाची बातमी : वीज कर्मचाऱ्यांना तत्वतः बोनस जाहीर; विश्वासात न घेतल्याने संप होणारच 

भाजप नेते विनोद तावडे यांना हरियाणाचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. तर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेशाच्या सहप्रभारीपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. या दोघांशिवाय सुनील देवधर यांची देखील सहप्रभारीपदी नेमूणक झालीये ते आंध्रप्रदेशचे सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. त्रिपुरामध्ये सुनील देवधर यांची कामगिरी चांगली राहिलीये.  

विनोद तावडे यांना तिकीट न दिलं जाणे, पंकजा मुंडे यांची भारतीय जनता पक्षाच्या राज्य नेतृत्वावर असलेली नाराजी अनेकदा समोर आलीये. अशात या दोनही नेत्यांना भाजपने केंद्रात कार्यकारिणीत स्थान स्थान दिलं होतं . दरम्यान बिहारच्या निवडणणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी जशी राहिलीये तशी कामगिरी विनोद तावडे आणि पंकजा मुंडे करून दाखवतात का याकडे आता अनेकांचे डोळे लागले आहेत.

bjps central team has given major responsibility to pankaja munde and vinod tawade

loading image
go to top