भारती सिंग पाठोपाठ पती हर्ष लिंबाचियालाही NCBकडून अटक, 18 तास चौकशी

पूजा विचारे
Sunday, 22 November 2020

भारती हिचा पती हर्ष लिंबाचिया याचीही एनसीबीकडून चौकशी सुरु होती. त्यानंतर तब्बल १८ तासांच्या चौकशीनंतर भारती सिंगचा पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीनं अटक केली आहे.

मुंबईः चार तासांच्या चौकशीनंतर केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अखेर कॉमेडी क्वीन भारती सिंगला अटक केली. तिच्या कार्यालय आणि घरात एनसीबीने टाकलेल्या छाप्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला आहे. त्यानंतर भारती हिचा पती हर्ष लिंबाचिया याचीही एनसीबीकडून चौकशी सुरु होती. त्यानंतर तब्बल १८ तासांच्या चौकशीनंतर भारती सिंगचा पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीनं अटक केली आहे. एनसीबीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकला होता.

याप्रकरणी एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे खार दांडा येथे छापा टाकून 21 वर्षीय संशयित वितरकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एलएसडीचे 15 ब्लॉट्स, 40 ग्रॅम गांजा आणि नाट्राझेपम  सापडले. याप्रकरणी आरोपीची चौकशी आणि इतर माहितीच्या आधारे कॉमेडी क्वीन भारती सिंगचे घर आणि प्रोडक्शन कार्यालयात एनसीबीने छापे मारले. त्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला आहे. त्यानंतर त्यांना दोघांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. भारती मर्सीडिज कारमधून तर हर्षला एनसीबीच्या वॅनमधून कार्यालयात नेण्यात आले. तेथे भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात त्यांनी गांजाचे सेवन करत असल्याचे दोघांनीही मान्य केले.

अधिक वाचा-  मुंबईत सरसकट लोकल प्रवास लांबणीवर? सध्याच्या प्रवासातही कपातीचे संकेत

चार तास चौकशीनंतर भारती सिंगला अटक करण्यता आली असून तिच्याविरोधात अंमली पदार्थ प्रथिबंधक कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हर्षची चौकशी रात्री उशीरापर्यंत करण्यात आली. याशिवाय आणखी एका कारवाईत एमडी वितरणाप्रकरणी दोन वॉर्डेट आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एनसीबीने बॉलिवूडमधील ड्रग्स वितरकांविरोधात जोरदार मोहिम चालवली असून त्यात वितरकांसह बॉलिवूडशी संबंधित काही व्यक्तींचीही नावे समोर आली होती. नुकतीच अभिनेता अर्जून रामपालची एनसीबीने चौकशी केली होती. त्यासोबत प्रसिद्ध निर्माता फिरोज नाडियादवाला याचीही एनसीबीने चौकशी केली होती त्यानंतर आता भारती सिंगला अटक करण्यात आली आहे.

after questioning NCB arrests Bharti Singh husband Harsh Limbachiyaa


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after questioning NCB arrests Bharti Singh husband Harsh Limbachiyaa

टॉपिकस
Topic Tags: