कोरोनातून बरे झाल्यानंतर म्यूकरमायकोसिस कशामुळे होतो?

डोळे, जबडा गमवावा लागू शकतो.
mucormycosis
mucormycosismucormycosis
Updated on

मुंबई: कोरोनाच्या (corona virus) बरोबरीने म्यूकरमायकोसिस (mucormycosis) आजाराने सध्या चिंता वाढवली आहे. म्यूकरमायकोसिस आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे. नाकापासून इन्फेक्शन (infection) सुरु झाल्यानंतर ते वरचा जबडा आणि नंतर मेंदूपर्यंत पोहोचते. म्यूकरमायकोसिस मेंदूपर्यंत पोहोचल्यास मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते, असे केईएमच्या नाक, डोळ, घसा तज्ज्ञ विभागाच्या डॉ. हेतल मारफातिया यांनी सांगितले. म्यूकरमायकोसिस आजारामध्ये मृत्यूदर ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. (After recover from corona now people suffering from mucormycosis)

कोरोनामधुन बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिसचा आजार आढळून आला आहे. म्यूकरमायकोसिस आजाराचे रुग्ण का वाढले? त्याची माहिती केईएम रुग्णालयाचे डीन हेमंत देशमुख यांनी दिली. "कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती, यामुळे म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले आहे" असे हेमंत देशमुख म्हणाले.

mucormycosis
मुंबईकरांना आज 'या' केंद्रांवर मिळणार लस

"सध्या आमच्या केईएम रूग्णालयात पहिल्या लाटेनंतर म्युकरमायकोसिसचे ११ रूग्ण आढळून आले होते. मात्र दुस-या लाटेनंतर दुप्पट २५ रूग्ण आढळून आले आहेत. आम्हाला काही रूग्णांवर उपचार करणे देखील कठिण झाले आहे" असे हेमंत देशमुख यांनी सांगितले.

mucormycosis
पतीशी सेल्फीवरून वाद, विक्रोळीत बायकोची धावत्या लोकलपुढे उडी

म्यूकरमायकोसिस आजारामध्ये ट्रीटमेंट करताना औषधांची कमतरता हेच एक आव्हान नाहीय, तर या आजाराचे उपचारही खूप महागडे असतात. उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचा असतो. औषधांचे रोजचा खर्च ६० ते ८० हजार असतो आणि रुग्णाला तीन आठड्यांपर्यंत ही औषधे घ्यावी लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com