साडेतीन तासांनंतर वर्षा राऊत यांची ईडी चौकशी संपली

साडेतीन तासांनंतर वर्षा राऊत यांची ईडी चौकशी संपली

मुंबई - संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या आज सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. वर्षा राऊत यांना मागील वेळी समन्स आल्यांनतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली होती. यानंतर वर्षा राऊत यांनी ED चौकशीसाठी हजर राहण्यास काही दिवसांचा वेळ मागून घेतला होता. त्यानंतर आज वर्षा राऊत ED  कार्यालयात हजर झाल्यात. त्यांची गेल्या साडेतीन तासांपासून त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर त्या कार्यालयाच्या मागच्या दरवाज्यातून परतल्या आहेत.

PMC बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ED  ने नोटीस बजावत २९ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानंतर वर्षा राऊत यांच्याकडून अतिरिक्त वेळ मागून घेण्यात आला होता. खरंतर वर्षा राऊत यांच्याकडून पाच जानेवारी पर्यंतचा वेळ मागून घेण्यात आलेला. दरम्यान आज एक दिवस आधीच वर्षा राऊत या ED कार्यालयात हजर झाल्या होत्या. ईडी ने या व्यवहारांविषयी विचारले असता,  मैत्री खातर हे 55 लाख रुपये आपण घेतले असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या साडेतीन तासांच्या चौकशीनंतर वर्षा राऊत मागील दरवाज्याने घरी परतल्या आहेत.

काय आहे प्रकरण : 

PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. सुरुवातीला प्रकरण हे EOW करत होती, नंतर हे प्रकरण ED कडे गेलं. वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आलं. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचं समजलं. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. हे पैसे का घेतले गेले याची माहिती ED ला हवी आहे. राज्यसभेच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केल्याचीही माहिती आहे. या 55 लाखांच्या माहितीसाठी ED ने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले होते. 

After three and a half hours of interrogation Varsha Rauts ED interrogation ended

------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com