विरार - हातावर पोट घेऊन दर्यात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अवकाळी पावसामुळे आपल्या बोटी किनाऱ्यावर आणाव्या लागल्या असतानाच आता वादळाच्या इशाऱ्याने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पावसाळ्या पूर्वीच्या शेवटच्या हंगामात बसलेला हा फटका मोठा असून, त्यामुळे मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छीमारी बंदी ही १ जूनऐवजी १० जून करण्याची मागणी पुढे येत आहे.