
पुन्हा गाव तिथे एसटी!
मुंबई - कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प झालेली एसटीची प्रवासी सेवा आता हळूहळू रुळावर येत आहे. ९० टक्के कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले असून, गाव तिथे एसटी दिसायला लागली आहे. एसटीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनीही सेवेला चांगला प्रतिसाद दिला असून सध्या १२ हजार ३२३ एसटी बस राज्यभरात पुन्हा धावू लागल्या आहेत. प्रवासी वाढल्याने उत्पन्नातही वाढ झाली आहे. एसटीच्या विलीनीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी केलेला बेकायदा संप तब्बल पाच महिने भरकटला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपले वेतन गमवावे लागले. परिणामी एसटीच्या सेवा कोलमडल्या. सामान्य परिस्थितीत एसटीचे दैनंदिन २२ कोटींचे उत्पन्न होते. दिवसाला ६५ लाख प्रवासी वाहतूक केली जात होती. आता उत्पन्नावर आणि प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. तरीही १६ एप्रिलनंतर एसटीच्या सेवा पूर्वपदावर येत आहे. ६ हजार ९०० बसमधून १२ लाख ९४ हजार प्रवासी सेवा दिली जात होती. १२ हजार ३२३ बसमधून तब्बल २३ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.
आठवड्यात १४ कोटींचे उत्पन्न
संपकाळात अंशतः एसटी सेवा सुरू होती. सहा ते नऊ लाखांच्या घरात असलेल्या उत्पन्नामध्येही आता वाढ होताना दिसून आली आहे. आता १० कोटींपेक्षा जास्त दैनंदिन उत्पन्न होत आहे. यंदाच्या आठवड्यात तब्बल १४ कोटींच्या उत्पन्नाची नोंद झाली आहे.
Web Title: Again Village There St Bus
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..