Sharad Pawar : ...तर सरकार विरोधात संघर्ष अटळ; शरद पवार यांचा दुष्काळावरून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा

पाण्याच्या गंभीर टंचाईकडे लक्ष वेधताना पवार यांनी म्हटले आहे, की मागील वर्षी राज्यात केवळ १ हजार १०० टँकर होते.
Sharad Pawar
Sharad Pawar Sakal

Mumbai News : ‘‘राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळित झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही.

जर सरकारने दुष्काळ निवारणाबाबत तातडीने पावले उचलली नाहीत तर, जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल,’’ असा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

पाण्याच्या गंभीर टंचाईकडे लक्ष वेधताना पवार यांनी म्हटले आहे, की मागील वर्षी राज्यात केवळ १ हजार १०० टँकर होते. आजमितीस ती संख्या ११ हजारांच्या वर गेली असून टँकरसाठी पाणी भरण्याचे स्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे.

पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून राज्य शासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना घेतल्या नाहीत, हे दुर्दैव असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

परिस्थिती गंभीर

मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. उजनी, जायकवाडी सारखी महत्त्वाची धरणे आटली आहेत. मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भालादेखील बसली आहे.

धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलडाणा जिल्ह्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव व सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी ह्या तालुक्यांतील पाणी टंचाई अधिक चिंताजनक बनली असल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले आहे.

मंत्र्यांच्या गैरहजेरीची दखल घेतली असेल!

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या बैठकीला मंत्री गैरहजर होते. मंत्र्यांच्या गैरहजेरीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलीच असेल,असे नमूद करत पवार यांनी मराठवाड्यातील काही मंत्र्यांकडे इशारा केला आहे. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अंग झटकून काम करत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला, तसेच २४ मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेची माहिती देत पुन्हा एकदा सरकारला दुष्काळ प्रश्नावर सहकार्य करण्याची ग्वाही असल्याची आठवण करून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com