व्हॉट्‌सऍपच्या प्रायव्हसी पॉलिसीविरुद्ध; व्यापारी संघटना सर्वोच्च न्यायालयात 

व्हॉट्‌सऍपच्या प्रायव्हसी पॉलिसीविरुद्ध; व्यापारी संघटना सर्वोच्च न्यायालयात 

मुंबई - व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकच्या मनमानी प्रायव्हसी पॉलिसीविरुद्ध कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही पॉलिसी रद्द करण्याची मागणी याचिकेत आहे. 
या प्रायव्हसी पॉलिसीद्वारे व्हॉट्‌सऍपतर्फे नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांवर अतिक्रमण केले जात आहे. त्याउलट व्हॉट्‌सऍप भारतीय नियमांनुसार चालविण्यासाठी केंद्र सरकारने निर्देश द्यावेत आणि नागरिक-व्यावसायिक यांच्या गोपनीयतेचे रक्षण करणारे नियम तयार करावेत, असेही अर्जदारांनी याचिकेत म्हटले आहे. 

व्हॉट्‌सऍपच्या युरोप आणि भारतातील प्रायव्हसी पॉलिसी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे भारतीय वापरकर्त्यांच्या तपशिलाचा दुरुपयोग होऊ शकतो. या कंपन्या भारतीय वापरकर्त्यांना फसवून त्यांचा तपशील गोळा करीत आहेत, असा अर्जदारांचा दावा आहे. व्हॉट्‌सऍप भारतात आले तेव्हा भारतीय वापरकर्त्यांचा तपशील घेणार नाही, असे प्रथम सांगण्यात आले होते. 2014 मध्येही फेसबुकने व्हॉट्‌सऍप ताब्यात घेतले तेव्हाही वापरकर्त्यांचा तपशील गोपनीय राहील का, अशी शंका वर्तविली जात होती; पण तेव्हा ही पॉलिसी बदलली जाणार नाही, असे व्हॉट्‌सऍपने सांगितले होते; मात्र ऑगस्ट 2016 मध्ये व्हॉट्‌सऍपने या आश्‍वासनाचा भंग करून वापरकर्त्यांचा तपशील फेसबुकला देण्याची पॉलिसी आणली. त्यानंतर तेव्हापासून ते सतत नियम बदलत आहेत व आता त्यांनी त्रयस्थ व्यक्तीला वापरकर्त्यांचा तपशील देण्याची पॉलिसी आणली आहे. यासंदर्भात न्यायालयाने सुयोग्य आदेश द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. 

Against WhatsApps privacy policy Trade unions in the Supreme Court

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com