एकीकडे कोरोनाची लढाई, दुरीकडे भाजपचे ‘टार्गेट उद्धव ठाकरे’; असं आहे भाजपचं नियोजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

महाराष्ट्र बचावची हाक; आंदोलनाचा दुसरा टप्पा 

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून, राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप 22 मे रोजी आणखी एक आंदोलन करणार असून, त्याचा रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित अपयशावर असेल.

उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या या आंदोलनाचे स्वरूप कसे असावे, कोणत्या घोषणा द्याव्यात, कसले कपडे घालावेत अशा तपशीलवार सूचना प्रदेश भाजप कार्यालयाने पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रत्येक फलकावर ‘उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार’ अशी मुख्य घोषणा असावी, असे बजावण्यात आले आहे. भाजप प्रदेश नेतृत्वाने कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलेल्या घोषणांची यादी पाहता, या आंदोलनाचे मुख्य लक्ष्य उद्धव ठाकरे हेच असल्याचे स्पष्ट दिसते.

1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वे ट्रेन्सचं बुकिंग सुरु, 'हे' आहेत नियम, 'असं' करा तिकीट बुक

असे आहे नियोजन :

  • शुक्रवारी सकाळी 11 ते 11.30  या वेळेत सोशल डिस्टन्सिंग पाळून आंदोलन.
  • काळे कपडे घालून, काळ्या फिती बांधून कार्यकर्त्यांचे घराच्या व्हरांड्यात आंदोलन.
  • भाजप प्रदेश कार्यालयाकडून आंदोलनासाठी कार्यकर्त्यांना घोषणांची यादी. 
  • ‘उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार’ ही मुख्य घोषणा प्रत्येक फलकावर.
  • प्रांत स्तरावरील पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनानंतर जिल्हाधिकारी,तहसीलदारांना निवेदन. 
  • ठिकठिकांच्या आंदोलनाची छायाचित्रे काढून समाज माध्यमांवरून प्रसिद्धी.

agitation against mahavikas aaghadi bjp to tarhet uddhav thackeray from maharashtra bachao


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation against mahavikas aaghadi bjp to tarhet uddhav thackeray from maharashtra bachao