पगार नसल्याने कर्मचाऱ्यांचे CSMTला आंदोलन; एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पगार नसल्याने कर्मचाऱ्यांचे CSMTला आंदोलन; एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई   :  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कंत्राटी पद्धतीवर रेल्वे उद्घोषकांना करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी  (ता. 31) रोजी  गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर धरणे आंदोलन सुरु केले आहे. नुकताच उद्घोषणा कर्मचाऱ्याने वेतन न मिळाल्याने आर्थिक परिस्थिती खालावली होती. वारंवार वरिष्ठांशी चर्चा करून निवेदन देऊनही वेतन मिळाले नाही. परिणामी, या सर्वाला कंटाळून उल्हासनगरमधील व्यंकटेश वेणूगंटी या उद्घोषकांने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.या घटनेवरून रेल्वेचे सर्व कंत्राटी उद्घोषकांनी कंत्रादाराविरोधात आंदोलन सुरु केले आहे. सीएसएमटी येथे 50 ते 60 कर्मचारी आंदोलन करण्यास उंभे होते. 

सध्या ए अ‍ॅण्ड एस ऑऊट सोर्सिंग नावाच्या कंपनीला रेल्वेमध्ये अनाऊन्सर इंडिकेटर ऑपरेटरचे कंत्राट दिले आहे. मध्य रेल्वेच्या ३५ पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर कंत्राटी उद्घोषकांची नेमणूक केली आहे. मुंबई आणि उपनगरातील २५० तरुण-तरुणी या रेल्वे स्थानकावर कंत्राटी उद्घोषक म्हणून काम करतात. यामध्ये सर्वाधिक मराठी मुला-मुलींचा समावेश आहे.
सीएसएमटी येथे जमा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. आम्हाला विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची भेट घेऊ द्या, असे कर्मचारी पोलिसांना सांगत होते. तुटपुंज्या पगारात काम करणाऱ्या कंत्राटी उद्घोषकांना कोरोना काळातील मागील चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यासंबंधी कंत्राटदाराची तक्रार केल्यास नोकरी वरून काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप कंत्राटी उद्घोषकांनी केला.

सॅलरी स्लिप, बोनस, पीएफ, वेतन मिळत नसल्याने भिवपुरी ते ठाकुर्ली येथे काम करणारा उद्घोषक व्यंकटेश वेणूगंटी आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची झाली होती. त्याने  रेल्वे प्रशासनाला आणि कंत्राटदाराला पत्र व्यव्हार केला होता. मात्र त्यावर रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदारांकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंटाळून त्यांने बुधवारी रात्री विषप्राशन करुन आपला जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधीत व्हिडिआ समाज माध्यमांवरही टाकला होता. व्हिडिओ समाज माध्यमावर टाकला होता. व्हिडिआ व्हायरल होताचं रेल्वेच्या सर्व कंत्राटी उद्घोषकांनी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, आमची वेतनाची समस्या सोडवून टाका, अशी कैफियत  व्यंकटेश वेणूगंटी यांनी मांडली. 

Agitation of employees to CSMT due to non-payment of salary One going to die

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com