राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; पोलिसांची ड्रोनने नजर

टीम ईसकाळ
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांची नारेबाजी सुरू आहे.

मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटिस पाठवण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर होणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. दक्षिण मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांची नारेबाजी सुरू आहे. राज्यभरात पवारांच्या समर्थनार्थ आंदोलने सुरू आहेत.

साहेबांच्या प्रेमापाेटी सातारा जिल्ह्यातील बाजारपेठा बंद

आज (ता. 27) दुपारी 2 वाजता शरद पवार ईडीच्या कार्यालयात उपस्थित होतील. आज त्यांना हजर राहण्याची कोणतीही नोटीस दिलेली नसताना आज ते चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांसह थोड्यावेळापूर्वी बैठक झाली. तसेच राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलने सुरू आहेत.

‘सरकार हम से डरती है, ईडी को आगे करती है!’; राष्ट्रवादीचे राज्यभरात आंदोलन

मुंबईत कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. नुतक्याच मिळालेल्या माहितीनुसार ईडीने पत्र पाठवून आज चौकशीची गरज नाही, असे कळवले आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे. ड्रोनद्वारे पोलिस परिसरावर लक्ष ठेवतील. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation by NCP party workers at ED office