
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. रोशनीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 22 मे 2010 रोजी मंगळूर एअरपोर्टवर असाच विमान अपघात झाला होता आणि या विमान दुर्घटनेत सुद्धा डोंबिवलीची एक तरुणी तेजल कामुलकरवर काळाने घाला घातला होता.