

AICTE
ESakal
जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या ए. सी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात नवी मुंबई येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने सिलिकॉनपासून पेरोव्स्काइट फोटोव्होल्टाइकपर्यंत या विषयावर एआयसीटीई–अटल पुरस्कृत ऑनलाइन प्राध्यापक विकास कार्यक्रम (FDP) दिनांक ५ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडला. या सहा दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात औपचारिक उद्घाटन समारंभाने झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सी. एस. मालवी, प्राध्यापक, सौर ऊर्जा विशेषज्ञ व यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख, एमआयटीएस, ग्वाल्हेर उपस्थित होते.