मुंबई : सीएसएमटी ते गोरेगाव एसी लोकल सुरू | Mumbai train update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AC local
मुंबई : सीएसएमटी ते गोरेगाव एसी लोकल सुरू

मुंबई : सीएसएमटी ते गोरेगाव एसी लोकल सुरू


मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हार्बर मार्गावरून (Harbor route) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सीएसएमटी ते गोरेगाव (csmt to goregaon) एसी लोकल (AC local train starts) फेऱ्या सुरू केल्या आहेत. आता मुंबई हार्बर मार्गावरून सीएसएमटी ते वाशी/ पनवेल आणि वांद्रे / गोरेगाव स्थानकाच्या दरम्यान सोमवारपासून (train starts from Monday) (ता. ३) १६ एसी लोकल धावणार आहेत; तर ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्या अल्प प्रतिसादामुळे बंद करून त्याऐवजी सामान्य लोकल धावणार आहे. (Air conditioner local trains starts from Monday)

हेही वाचा: मुंबई : पोलिसांनी केले तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; तिघांना अटक

सर्वात प्रथम पहिली एसी लोकल डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेवरून सुरू झाली. त्यानंतर मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर, मुख्य मार्गिका आणि हार्बर मार्गावरून एसी लोकल चालविण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम मध्य रेल्वेने जानेवारी २०२० पासून ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेलदरम्यान एसी लोकल सुरू केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डिसेंबर २०२० पासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दुसरी एसी लोकल चालविण्यास सुरुवात केली. मध्य रेल्वेने सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून त्या वेळेवर एसी लोकल चालविण्यास सुरुवात केली. मात्र, एसी लोकलचे तिकीट दर प्रवाशांना परवडत नसल्याने एसी लोकलमध्ये बोटावर मोजण्याइतके प्रवासी जात होते.

मध्य रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून एसी लोकल चालविण्यास सुरुवात केली. मात्र, एसी लोकलमधून प्रवास करणारे कोणीही नसल्याने ही गाडी रिकामी जात होती. त्यानंतर सामान्य लोकलची फेरी होत होती. त्यामुळे एक सामान्य लोकल सुटल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या सामान्य लोकलसाठी साधारण १५-२० मिनिटे वाट पाहावी लागत होती. त्यातच सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द केल्याने इतर लोकलमध्ये प्रवाशांच्या गर्दीचे प्रमाण वाढत होते. ट्रान्स हार्बर मार्गावर धावणाऱ्या १६ एसी लोकलला प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने मध्य रेल्वेने या १६ एसी लोकलचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी वाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती

सध्या ट्रान्स हार्बर मार्गावर १६ वातानुकूलित लोकल सेवा धावत आहे. मात्र, या लोकल सेवांना प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा सोमवारपासून बंद करून त्याऐवजी सामान्य लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात ट्रान्स हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची संख्या ही १ हजार १९७ इतकी होती. म्हणजे प्रतिदिवस फक्त ४० प्रवासी प्रवास करत होते.

१६ एसी लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक

वांद्रे - सीएसएमटी पहाटे ४.१७ वाजता
सीएसएमटी - पनवेल पहाटे ४.५२ वाजता
पनवेल - सीएसएमटी सकाळी ६.२९ वाजता
सीएसएमटी - वांद्रे सकाळी ७.५१ वाजता
वांद्रे - सीएसएमटी सकाळी ८.२८ वाजता
सीएसएमटी- गोरेगांव सकाळी ९.०२ वाजता
गोरेगांव- सीएसएमटी सकाळी १०.०६ वाजता
सीएसएमटी - वाशी सकाळी ११.०८ वाजता

वाशी-सीएसएमटी दुपारी ४.४४ वाजता
सीएसएमटी - गोरेगाव संध्याकाळी ५.३७ वाजता
गोरेगाव - सीएसएमटी संध्याकाळी ६.४१ वाजता
सीएसएमटी- वाशी संध्याकाळी ७.४४ वाजता
वाशी - सीएसएमटी रात्री ८.४९ वाजता
सीएसएमटी- पनवेल रात्री ९.४२ वाजता
पनवेल-सीएसएमटी रात्री ११.१३ वाजता
सीएसएमटी- वांद्रे रात्री १२.३६ वाजता

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top