

Mumbai Shocker: 21-Year-Old Air Hostess Found Dead, Phone Reveals Disturbing Evidence; Accused Absconding
esakal
Mumbai Air Hostess Suicide Case : मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यात कल्याण पूर्व भागात राहणाऱ्या एका २१ वर्षीय एअर होस्टेसने स्वत:चे जीवन संपवले. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, आरोपी अद्याप फरार असल्याने पीडितेच्या नातेवाईकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. प्रेमाच्या नावाखाली लग्नाचे आश्वासन देऊन लाखो रुपयांची आर्थिक लूट आणि शारीरिक छळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत. इतकेच नव्हे, तर या तरुणीला आत्महत्येसाठी भाग पाडण्यात आल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.