
मुंबई: अंधेरीतील एका अपार्टमेंटमध्ये २५ वर्षीय एयर इंडिया पायलट सृष्टी तुली यांचा मृतदेह सोमवारी आढळला. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची रहिवासी असलेल्या सृष्टीनं मुंबईत तिच्या स्वप्नांच्या उड्डाणासाठी पाऊल ठेवले होते. मात्र तिच्या जीवनाचा असा शेवट होईल, हे कुणीच कल्पना केली नव्हती. या घटनेनंतर तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून तपास अधिक गडद होत आहे.