Mumbai Air Quality Index: मुंबईकरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावतो आहे. उपनगरांमध्ये हवेतील सूक्ष्मकण PM2.5 ची पातळी 100 µg/m³ पेक्षा अधिक आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.
शनिवारी ही पातळी १००µg/m³ इतकी नोंदवण्यात आली. ही पातळी राष्ट्रीय सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. या प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे.