मुंबईत हवा अतिशय वाईट, प्रदूषणात दिल्लीला ही टाकले मागे

भाग्यश्री भुवड
Thursday, 7 January 2021

गेल्या सात दिवसांपासून मुंबईतील अतिशय प्रदूषित झाली आहे. मुंबईने हवेच्या प्रदूषणात दिल्लीला ही मागे टाकले आहे.

मुंबई: मुंबईसह राज्यात सध्या थंडी अनुभवायला मिळत आहे.  मात्र, गेल्या सात दिवसांपासून मुंबईतील अतिशय प्रदूषित झाली आहे. मुंबईने हवेच्या प्रदूषणात दिल्लीला ही मागे टाकले आहे. सफर या संस्थेने पुन्हा एकदा मुंबई संपूर्ण शहराची हवा अतिशय वाईट नोंदवली आहे. गुरुवारी 313 एक्यूआयची नोंद करण्यात आली आहे. त्या तुलनेत दिल्ली संपूर्ण शहराची हवा गुणवत्ता निर्देशांक 239 एक्यूआय नोंदवण्यात आला असून वाईट दर्जा नोंदवण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यात वातावरणात बदल होत आहे. शिवाय, गेल्या सात दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता मात्र खालावली असल्याचं समोर आलं आहे. 'सफर' या हवेच्या गुणवत्ता नोंदवण्याऱ्या प्रणालीने दिलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी मुंबईचा गुणवत्ता निर्देशांक 313 होता. ज्याची नोंद अतिशय वाईट पीएम 2.5 मध्ये झाली आहे.

धुरक्याच्या प्रभावाने मुंबईसह नवी मुंबईची हवा सलग सात दिवसांपासून अतिशय वाईट दिसून आली आहे. मुंबईत हळूहळू अनलॉक व्हायला सुरूवात झाली असून अनेक रस्त्यांवर गाड्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. शिवाय, गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले कारखाने, मोठ मोठ्या कंपन्याचे काम सुरू झाल्या कारणाने, वाहनांची गर्दी वाढल्याने मुंबईतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गेली सहा महिने ठप्प असलेली वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने ही पातळी वाढल्याचे दिसून येत आहे.  लॉकडाऊनच्या काळात महामुंबईतील प्रदूषण कमालीचे कमी झाले होते. आता गेल्या आठवडाभरापासून शहरात प्रदूषणाचे धुरके देखील दिसून लागले आहेत.

मुंबई शहरापाठोपाठ  कुलाबा, माझगाव, मालाड, बोरीवली, बीकेसी, चेंबूर, अंधेरी या ठिकाणची हवा अतिशय वाईट नोंदवण्यात आली आहे. तर, भांडुप परिसरातील हवा वाईट स्वरुपाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत थंडीचा अनुभव येत आहे. शिवाय, मुंबईत अनेक पावसाची रिमझिम सुरू आहे, याचा फटका आरोग्यावर बसत आहे.

हेही वाचा- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका

वरळीत मध्यम हवा
दरम्यान वरळी या परिसरातील हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आहे. लॉकडाऊन होण्याच्या आधी मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला होता. शिवाय, हवेत प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात होते. पण, लॉकडाऊनदरम्यान  हवेच्या दर्जावर पुन्हा परिणाम झाला असून हवा अतिशय वाईट दर्जाची नोंदवण्यात येत आहे.

सफर संस्थेच्या अहवालानुसार

मुंबई पूर्ण शहर ( 313 एक्यूआय )  मुख्य प्रदूषक पीएम 2.5 अतिशय वाईट
बोरिवली (326 एक्यूआय ), मुख्य प्रदूषक पीएम 2.5 अतिशय वाईट
मालाड (अतिशय वाईट 311 एक्यूआय )  मुख्य प्रदूषक पीएम 2.5
बीकेसी (अतिशय वाईट 319 एक्यूआय ), मुख्य प्रदूषक पीएम 2.5
अंधेरी (अतिशय वाईट 319 एक्यूआय ), मुख्य प्रदूषक पीएम 2.5
कुलाबा ( अतिशय वाईट 337 एक्यूआय ), मुख्य प्रदूषक पीएम 2.5
माझगाव (अतिशय वाईट 317 एक्यूआय ),मुख्य प्रदूषक पीएम 2.5
वरळी ( मध्यम 193 एक्यूआय ) ,मुख्य प्रदूषक पीएम 2.5
भांडुप (वाईट 204 एक्यूआय )  मुख्य प्रदूषक पीएम 2.5
चेंबूर (अतिशय वाईट 314 एक्यूआय ) ,मुख्य प्रदूषक पीएम 2.5
नवी मुंबई( अतिशय वाईट 329 एक्यूआय ) मुख्य प्रदूषक पीएम 2.5

दिल्ली शहराची हवा वाईट
मुंबईच्या तुलनेत दिल्लीची हवा वाईट दर्जाची नोंदवण्यात आली असून मुख्य प्रदूषक पीएम 2.5 नोंदवण्यात आला आहे.

दिल्ली ( वाईट 239 एक्यूआय ) मुख्य प्रदूषक पीएम 2.5
पुसा ( वाईट  232 एक्यूआय ) मुख्य प्रदूषक पीएम 2.5
लोधी रोड ( वाईट  232 एक्यूआय ) मुख्य प्रदूषक पीएम 2.5
दिल्ली विद्यापीठ ( वाईट  228 एक्यूआय) मुख्य प्रदूषक पीएम 2.5
 विमानतळ (टी 3) ( वाईट  266 एक्यूआय ) मुख्य प्रदूषक पीएम 2.5
नोएडा ( वाईट  242 एक्यूआय ) मुख्य प्रदूषक पीएम 2.5
मथुरा ( वाईट  256 एक्यूआय ) मुख्य प्रदूषक पीएम 2.5
आयानगर ( वाईट  215 एक्यूआय ) मुख्य प्रदूषक पीएम 2.5
आयआयटी दिल्ली ( वाईट 242 एक्यूआय ) मुख्य प्रदूषक पीएम 2.5
 गुरुग्राम ( वाईट  208 एक्यूआय ) मुख्य प्रदूषक पीएम 2.5

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Air pollution Mumbai bad 313 AQI recorded Safar Institution report


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air pollution Mumbai bad 313 AQI recorded Safar Institution report