

Mumbai AQI
ESakal
मुंबई : दिवाळीनंतर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत पुन्हा घसरण झाली असून, शहराचा वायुप्रदूषण निर्देशांक (एक्यूआय) सोमवारी (ता. १६) १३२ वर पोहोचला. गेल्या तीन दिवसांपासून हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत कायम असली, तरी अनेक भागांमध्ये प्रदूषणाची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे. कुलाबा येथे सर्वाधिक २५६, तर मालाड पश्चिम येथे १८८ आणि देवनार येथे १७६ एक्यूआयची नोंद झाली. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.