मुंबईकरांनो! मोकळा श्वास घ्या, मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम

मिलिंद तांबे
Monday, 14 September 2020

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारतेय. सोमवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 7 इतका नोंदला गेलाय. अनलॉक 4 सुरू झाला असला तरी मुंबईत गेल्या दोन दिवसांपाससून हवा सुटली असल्यानं हवेची गुणवत्ता टिकून असल्याचे दिसते.

मुंबई: मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारतेय. सोमवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 7 इतका नोंदला गेलाय. अनलॉक 4 सुरू झाला असला तरी मुंबईत गेल्या दोन दिवसांपाससून हवा सुटली असल्यानं हवेची गुणवत्ता टिकून असल्याचे दिसते.

मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक 7 इतका नोंदला गेला आहे. पीएम 10 चा निर्देशांक 35 तर पीएम 2.5 चा निर्देशांक 35 इतका नोंदला गेला आहे. हवेची गुमवत्ता उत्तम आहे. वायु प्रदुषणाचा कोणताही धोका नाही. आरोग्यासाठी देखील हे वातावरण उत्तम असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली होती. हवा गुणवत्ता निर्देशांक 104 वर गेला होता. मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली होती. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला होता. मात्र आठवड्याभरात प्रदुषणाची पातळी कमी झाल्याने मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे.

अधिक वाचाः  महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या 'या' नेत्याला रोहित पवारांनी खडसावले

मुंबईतील सर्व परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक 50 च्या खाली नोंदवला गेला असून हवा गुणवत्ता निर्देशांक उत्तम नोंदवला गेला आहे. मुंबईत केवळ अंधेरी परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 70 इतका नोंदवला गेला असून हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील किमान तापमान 25.53 तर कमाल तापमान 30.26 अंश सेल्सीअस इतके नोंदवले गेले आहे.

हेही वाचाः  माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणः शिवसेनेची भाजपवर सडकून टीका

मुंबईत सध्या पाऊस थांबला असला तरी वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे हवेतील धुळीकण तसेच वाहनांतून निघणारे विषारी वायु हवेसोबत निघून गेले आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचे दिसते. अशी स्थिती दोन ते तिन दिवस राहू शकते अशी माहीती सफर चे प्रकल्प संचालक डॉ गुफ्रान बेग यांनी दिली. 

अशी आहे हवेची गुणवत्ता

ठिकाण             एक्यूआय 
मुंबई शहर            7
भांडूप                 22
कुलाबा              46
मालाड              33
माझगांव           31
बोरिवली           49
चेंबूर                 30
अंधेरी               70
नवी मुंबई         30 

----------

(संपादनः पूजा विचारे) 

Air quality mumbai excellent index was recorded at 7


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air quality mumbai excellent index was recorded at 7