
Mumbai: नोव्हेंबर महिन्यात मुंबई विमानतळावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा झाली. महिनाभरात तब्बल ४७ लाख ७० हजार जणांनी विमान प्रवास केला. त्यात देशांतर्गत मार्गावर ३४ लाख तर आंतरराष्ट्रीय मार्गावर १३ लाख ७० हजार प्रवाशांचा समावेश होता. विशेष म्हणजे २७ नोव्हेंबरला विमानतळावरून सर्वाधिक ९४१ विमानांची वाहतूक झाली.
दिवाळीनिमित्त आलेल्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनासह मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. रेल्वे, बसमध्येही प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी अनेकांनी विमान प्रवासाला पसंती दिली. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात मुंबई विमानतळावरून २७ हजार २०० विमानांची ये-जा झाली.