

Airoli Katai expressway
ESakal
वाशी : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या ऐरोली-कटाई उन्नत मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या उन्नत मार्गातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामाने वेग घेतला आहे. उन्नत मार्गाच्या दोन्ही टप्प्यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे या वर्षा अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे. त्यामुळे नव्या वर्षात नवी फ्री-वे प्रवासासाठी मोकळा होणार आहे. त्यामुळे 2026 या वर्षात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.