New Mumbai : अनधिकृत बांधकामावर ऐरोलीत पालिकेची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vashi

अनधिकृत बांधकामावर ऐरोलीत पालिकेची कारवाई

वाशी : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ऐरोली सेक्टर ९ येथील दिवागावमध्ये सहदेव अपार्टमेंटजवळ जी प्लस दोनचे बांधकाम करण्यात येते होते. पालिकेची परवागनी न घेता न घेता सुरू असलेल्‍या कामाला नोटीस बजावली होती. परंतु त्यांनी बांधकाम सुरूच ठेवल्‍याने अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तामध्ये कारवाई करत बांधकात निष्कासित केले. सेक्टर ७ ऐरोली येथील पवन मिल्क सेंटर, पवन सुपर बाजार यांच्या दुकानांबाहेरील मार्जिनल स्पेसमधील जागेत सामान ठेवण्यात आले होते. त्‍यावरही महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. धडक मोहिमेसाठी ५ मजूर, १ गॅस कटर, २ इलेक्ट्रीक हॅमर, पीकअप व्हॅन या साधनांसह जी विभाग ऐरोली येथील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस पथक तैनात होते.

loading image
go to top