

Rais Shaikh
ESakal
भिवंडी : समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी इतर कोणत्याही पक्षासाठी काम करायचे असल्यास प्रथम आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा थेट इशारा समाजवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रभारी अजय यादव यांनी दिला आहे. रईस शेख यांनी ५ जानेवारीपर्यंत रजा घेतली असून त्यानंतरच त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.