अजित पवार, जयंत पाटील अडचणीत; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 22 August 2019

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते अडचणीत आले आहेत. या प्रकरणात पाच दिवसात गुन्हा नोंदवा आणि तपास करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज आर्थिक गुन्हे शाखेला दिले.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते अडचणीत आले आहेत. या प्रकरणात पाच दिवसात गुन्हा नोंदवा आणि तपास करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज आर्थिक गुन्हे शाखेला दिले.

अजित पवार पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुरेश देशमुख, आनंदराव अडसूळ, दिलीप सोपल, राजन तेली, मधुकर चव्हाण, माणिकराव पाटील, दिलीप देशमुख, हसन मुश्रीफ, गुलाबराव शिर्के यांच्यासह एकूण 50 जणांवर न्यायालयाने गुन्हे नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बड्या राजकीय नेत्यांनी नियमांचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्या मार्फत केली आहे.

अद्यापही याप्रकरणी गुन्हा न नोंदविल्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. शिखर बैकेच्या 42 संचालकासह 34 जिल्हा बैकांचा यामध्ये समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Jayant Patil in trouble High Court Orders to file a case