अजित पवार यांचा पुन्हा रात्रीस खेळ! काय घडले? वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले अजित पवार रात्री पावणे बाराच्या सुमारास घरातून बाहेर पडले. नाट्यमयरित्या देवेद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आज दिवसभर जणू अज्ञातवासात राहणेच पसंत केले होते. त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांचे दिवसभर वास्तव्य होते. पण, शपथविधीनंतर या निवासस्थानी गेलेले अजित पवार रात्री पावणे बाराच्या सुमारास त्यांच्या घरातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत चिरंजीव पार्थ पवारदेखील होते. 

राज्यात अजित पवार यांच्या एका निर्णयाने खळबळ उडाली. शनिवारी सकाळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यात सरकार स्थापन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं पत्र त्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केलं होतं. पण, त्यांच्या शपथविधीनंतर अवघ्या काही तासांतच शरद पवार यांनी, अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सगळंच चित्र स्पष्ट झालं. शरद पवार यांच्या ट्विटनंतर तोंडघशी पडलेल्या अजित पवार यांनी बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरीच राहणे पसंत केले. दिवसभर ते तेथेच होते.

दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नेत्यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, अजित पवार यांनी कोणाचेही ऐकले नाही. दिवसभर घरात राहिल्यानंतर रात्री पावणे बाराच्या सुमारास ते पार्थ पवार यांच्यासोबत बाहेर पडले आहेत. दरम्यान अजित पवार हे त्यांच्या चर्चगेटच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. उद्या सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीतर्फे अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर रात्रीत आता अजित पवार कुणाची भेट घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाच असणार आहे.  

ajit pawar leaves from nepean sea road residence and reached to his churchgate house 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar leaves from nepean sea road residence and reached to his churchgate house