
Sharad pawar and Ajit Pawar
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. माळेगाव साखर कारखान्याच्या सर्वसाधारण वार्षिक सभेची तारीख व वेळ निश्चित करण्यासाठी ही भेट घेतल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले असले; तरी या भेटीत राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचा अंदाज आहे.