VIDEO : अजित पवार सिल्व्हर ओकमध्ये पळत दाखल; स्वागताला सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

तब्बल तीन दिवसांनंतर अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेलेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोणतीही बातचीत झाली नव्हती. दरम्यान आज उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि महाविकास आघाडीच्या नेता निवडीनंतर आणि अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेलेत.

अजित पवार सिल्व्हर ओकमध्ये दाखल होताना धावत जाताना दिसलेत. अजित पवार हे सिल्व्हर ओकमध्ये दाखल होताना दरवाजा देखील उघडाच असल्याचं दृशांमध्ये पाहायला मिळालं.  आत गेल्यानंतर अजित पवार यांनी दरवाजा बंद करून घेतलेलं देखील पाहायला मिळालं. यावेळी सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या पाहायला मिळायला. 

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून गेले तीन दिवस मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. अनेक मोठ्या नेत्यांनी तसे प्रयत्न केल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं.  गेल्या काही दिवसात सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी अजित पवार यांना भावनिक आवाहन केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. आज महाराष्ट्रात अजित पवार We Love You असे फलक देखील झळकावताना पाहायला मिळाले.  

अशातच आता तीन दिवसानंतर अजित पवार हे शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच 'सिल्व्हर ओक'मध्ये दाखल झालेत.  सिल्व्हर ओक या निवास्थानी सुप्रिया सुळे देखील  हजर होत्या.

Webtitle : ajit pawar reached silver oak to meet sharad pawar

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar reached silver oak to meet sharad pawar