"असे येडे बरळतच असतात"; लक्ष्मण सावदी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत कडाडले

सुमित बागुल
Thursday, 28 January 2021

"मुंबईतील कानडी नागरिकांवर आम्ही कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नाही."

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर या सर्वांनी भाषणं केलीत. त्यानंतर आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी एक विवादास्पद वक्तव्य केलं आहे. 

लक्ष्मण सावदी म्हणालेत की, "मुंबईचाही कर्नाटकात समावेश करायला हवा. जोवर तसे होत नाही तोवर केंद्र सरकारने मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं." 

महत्त्वाची बातमी : मालदीवमध्ये राष्ट्रपती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चक्क एका शहाळ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
 

आता, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतून शिवसेनेचे फायरब्रँड नेते राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी सावदी यांच्यावर टीका करत "असे येडे बरळतच असतात" असं वक्तव्य केलं आहे. हा केवळ कर्नाटकाचा प्रश्न नाही. त्यामुळे कालच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलं तेच योग्य आहे.

धक्कादायक ! भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा 'त्या' शब्दाने उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला कारवाईचा इशारा

मुंबईतील कानडी नागरिकांवर आम्ही कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नाही. मात्र कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी  यांनी इतिहास समजून घेण्याची गरज आहे. मुंबईत कानडींना पूर्ण स्वातंत्र्य आहे. इथे कानडीत शाळा आहेत, महाराष्ट्रात अनेक संस्था देखील कानडींकडून चालवल्या जातात.  मात्र तशी परिस्थिती बेळगावमध्ये आहे का ? बेळगावमध्ये मराठीची काय स्थिती आहे ? कानडी नागरिकांना महाराष्ट्राच्या बाहेर जायचंय का हे देखील आधी विचारा असे खडेबोल संजय राऊतांनी सुनावलेत.

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या कानडी लोकांशी बोलावं, असंही राऊत म्हणाले.

mumbai political news reaction of sanjay raut on controversial statement of Karnataka Deputy CM Laxman Savadi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai political news reaction of sanjay raut on controversial statement of Karnataka Deputy CM Laxman Savadi