महाविकास आघाडीतील 'जोतिरादित्य सिंधीया'वर अजित पवार म्हणतात, आमच्यात...

महाविकास आघाडीतील 'जोतिरादित्य सिंधीया'वर अजित पवार म्हणतात, आमच्यात...

मुंबई - कोरोनामुळे विधिमंडळाचे कामकाज आटोपतं घेतण्यात येणार आहे. अशात आज विधानसभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. कालच विधानसभा सभागृहात बोलत असताताना सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला होता. महाराष्ट्रातही कुणीतरी जोतिरादित्य सिंधिया तयार होईल असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. यावर आज अजित पवार यांनी जशास तसं उत्तर दिलंय. आमच्यात कुणीही जोतिरादित्य शिंदे होणार नाही असं अजित पवारांनी उत्तर दिलंय.  

काय म्हणालेत अजित पवार ?

"इथे कुणीही जोतिरादित्य सिंधिया होणार नाही. तिकडेच कुणीतरी जोतिरादित्य सिंधिया होईल याकडे लक्ष ठेवा. जे गैरहजर आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. जे केलं ते मान्यच आहे. मी लपून काही करत नाही, समोर करतो. आणि तिथेही केलं, नंतर तिथेही सोडलं आणि इथे आलोय, इथेही मजबूत बसलोय  मी तिथे गेलो, आता इथे आहे आणि मजबूत आहे," असं अजित पवार म्हणालेत.  

अमित शहा यांना जोतिरादित्य शिंदे यांच्याबद्दल वाटतेय 'ही' भीती

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मध्यप्रदेशमधल्या २१ आमदारांनीही त्यांच्यासोबत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. मात्र असलं तरी भाजपनं अजूनही मध्यप्रदेशमध्ये सत्तास्थापनेचा दावा केला नाहीये. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदेही अजित पवारांसारखेच वागतील का अशी भीती भाजपला असण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला होता. भल्या पहाटे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाची शपथ होती. मात्र काही तासांमध्येच अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा  दिला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. अजित पवारांनी युटर्न घेतल्यामुळे अवघ्या  ८० तासांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. 

ajit pawar replies to sudhir mungantiwar over his comment about mahavikas aaghadis jotiraditya scindia

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com