"माझ्या घोषणांमुळे महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण" - रामदास आवठवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

मुंबई : जगभरात कोरोनाने आपले हातपाय पसरलेत. त्यात आता महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र रामदास आठवले आपल्या हटके स्टाईलमध्ये कोरोनाला मात द्यायला निघाले आहेत. काही दिवसांपूर्वी 'गो कोरोना..कोरोना गो' अशा घोषणा रामदास आठवले यांनी दिल्या होत्या. आपण अशा घोषणा दिल्या म्हणूनच राज्यात कोरोनाचे कमी रुग्ण आहेत असं आता त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर रामदास आठवले यांच्या फक्त घोषणाबाजीमुळे कोरोना घाबरला असं आठवलेंचं म्हणणं आहे.    

मुंबई : जगभरात कोरोनाने आपले हातपाय पसरलेत. त्यात आता महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र रामदास आठवले आपल्या हटके स्टाईलमध्ये कोरोनाला मात द्यायला निघाले आहेत. काही दिवसांपूर्वी 'गो कोरोना..कोरोना गो' अशा घोषणा रामदास आठवले यांनी दिल्या होत्या. आपण अशा घोषणा दिल्या म्हणूनच राज्यात कोरोनाचे कमी रुग्ण आहेत असं आता त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर रामदास आठवले यांच्या फक्त घोषणाबाजीमुळे कोरोना घाबरला असं आठवलेंचं म्हणणं आहे.    

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये कोरोनासंदर्भातील जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारफेरीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना… गो… गो कोरोना…’ अशी घोषणाबाजी केली होती. त्यावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. मात्र आता मी ‘गो कोरोना…कोरोना गो…’ अशी घोषणाबाजी केल्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण आहेत असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

मन सुन्न करणारी घटना : ...म्हणून मित्रांनी त्याची पॅन्ट खाली ओढून त्याचं गुप्तांग

मी जायला सांगितलं म्हणून गेला कोरोना :

“मी 'गो कोरोना' असं म्हटलं आहे. त्यामुळे तो महाराष्ट्र काय तर भारतामध्येही जास्त पसरला नाहीये. तरीही सरकारकडून यासंदर्भात काळजी घेतली जात आहे. आम्ही कोरोनाला जायला सांगितलं आहे. मात्र तो होऊ नये याची काळजी घेणं आपली आणि डॉक्टरांची जबाबदारी आहे. आपल्या गावामध्ये आणि आपल्यामध्ये  कोरोना येता कामा नये यासाठी आपणही काळजी घेणं गरजेचं आहे,” असं मत आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय. 

“गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना म्हणू का?”

रामदास आठवलेंनी त्यांना ट्रोल करणाऱ्यांनाही चांगलाच टोला लगावलाय. “एवढा गंभीर आजार देशात दाखल झाला असताना कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना ये असं म्हणणार आहे का ? कोरोना कम असं मी कधीच म्हणणार नाही. कोरोना गो असंच मी म्हणेन. यावरुन टीका करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. माझ्यावर टीका करणाऱ्या कोणावरही मी टीका करणार नाही. कोरोना गो म्हणजे कोरोनाने इथून जावं अशी माझी भूमिका आहे. कोरोनाने इथे  येऊ नये आणि आला असेल तर इथून जावं अशी प्रतिकात्मक भूमिका मी घेतली आहे. कोरोना देशातून जात नाही तोपर्यंत मी गो कोरोना असंच म्हणत राहीन,” असं रामदास  आठवलेंनी म्हंटलंय. 

घृणास्पद ! आपल्या मित्रांना 'त्याने' दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची परवानगी...

त्यामुळे रामदास आठवलेंनी फक्त घोषणा दिल्यामुळे कोरोना घाबरला आणि म्हणून कोरोनचे कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.  

only few patients of corona found in maharashtra due to my slogans said ramdaas aathawale


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only few patients of corona found in maharashtra due to my slogans said ramdaas aathawale