
Political Statements Ajit Pawar
Sakal
ठाणे : नैसर्गिक संकटाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता ‘एक आपले राज्य’ म्हणून सर्वांनी पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी त्यांनी ठाणे शहरातील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी पुढे जात असताना आम्ही बेरजेचे राजकारण करीत असल्याचेही ते म्हणाले.