esakal | अजित पवार यांचं शिवसेनेबाबत अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान, आजच्या बैठकीत दिल्या स्पष्ट सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार यांचं शिवसेनेबाबत अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान, आजच्या बैठकीत दिल्या स्पष्ट सूचना

महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. या तीनही पक्षांची वेगवेगळी विचारधारा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकमेकांसोबत अनेक वर्ष काम केलं आहे.

अजित पवार यांचं शिवसेनेबाबत अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान, आजच्या बैठकीत दिल्या स्पष्ट सूचना

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : आज मुंबईतील यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी शिवसेनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. एकीकडे राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरवात झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील काही नेते निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या चर्चा करतायत. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना शिवसेनेबाबत अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेशी जुळवून घ्या,  अशा सूचना अजित पवार यांनी दिल्यात.   

हेही वाचा-  मेट्रो-३ मार्गिकेच्या सीप्झ स्थानकातील स्लॅबचे बांधकाम पूर्ण

नक्की काय म्हणालेत अजित पवार : 

महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. या तीनही पक्षांची वेगवेगळी विचारधारा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकमेकांसोबत अनेक वर्ष काम केलं आहे. मात्र शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. अशात स्थानिक पातळीवर या पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये खटके उडतात. अशात अजित पवार यांनी अत्यंत सूचक आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. अजित पवार यावेळी म्हणालेत की, "आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थनिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये खटके उडत आहेत, पण आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या", असं महत्त्वाचं आणि सूचक विधान अजित पवार यांनी केलं आहे.   

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याआधी स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील २०२१ हे निवडणुकांचं वर्ष असणार आहे असं सांगत शिवसेना नेते, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होतो. आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतून आता राष्ट्रवादीनेही स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 

ajit pawar shivsena NCP grampanchayat elections political ruckus mahavikas aaghadi

loading image