esakal | मेट्रो-३ मार्गिकेच्या सीप्झ स्थानकातील स्लॅबचे बांधकाम पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो-३ मार्गिकेच्या सीप्झ स्थानकातील स्लॅबचे बांधकाम पूर्ण

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे राबवल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील पॅकेज-७ ने सीप्झ स्थानकाच्या सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण केले आहे.

मेट्रो-३ मार्गिकेच्या सीप्झ स्थानकातील स्लॅबचे बांधकाम पूर्ण

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे राबवल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील पॅकेज-७ ने सीप्झ स्थानकाच्या सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण केले आहे. या पॅकेजमधील मरोळ नाका आणि एम.आय.डी.सी. स्थानकांच्या सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले. बेस स्लॅब, कॉन्कोर्स स्लॅब, मॅझेनाईन स्लॅब आणि रूफ स्लॅबचे बांधकाम पूर्ण करण्यात झाले आहे. पॅकेज-७ मधील एकूण ७६ % बांधकाम पूर्ण झाले आहे.
 
मरोळ नाका स्थानक एन.ए.टी.एम. (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड) पद्धतीने बांधले जाणार असून येथे चार प्रवेश- निकासद्वार आहेत. मात्र सीप्झ आणि एम.आय.डी.सी. स्थानके कट-अँड-कव्हर पद्धतीने बांधण्यात येत आहेत. येथे अनुक्रमे चार आणि तीन प्रवेश-निकासद्वार आहेत. सीप्झ स्थानकावरून दररोज २४ हजाराहून अधिक प्रवाशांनी प्रवास करणे अपेक्षित आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सीप्झ प्रामुख्याने व्यावसायिक केंद्र मानले जाते. मात्र सध्या ते उपनगरीय रेल्वेमार्गाद्वारे जोडले गेले नाही. या क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा, सीप्झ गाव बस स्थानक, होली स्पिरीट रुग्णालय, आरे दूध वसाहत हि महत्त्वाची स्थळे आहेत.  त्यामुळे या व्यवसाय केंद्राला भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
रणजित सिंह देओल,  व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

हेही वाचा- "मुंबईत उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत हे आमचे ध्येय" : राजेंद्र यड्रावकर

परिसरातील वाहनांच्या रहदारीमुळे बरीच आव्हाने उभी राहिली होती. मात्र, वाहतूक पोलिस आणि एम.सी.जी.एम.च्या सहाय्याने काम सोपे झाले. मेट्रो मार्ग-३ सुरू झाल्यानंतर, हे स्थानक उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडण्याचे काम करेल. 
एस. के. गुप्ता, संचालक (प्रकल्प),  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Metro 3 line Seepz station Slab Construction work completed

loading image