esakal | म्हणून अजित पवारांनी घेतला यु टर्न आणि पुन्हा...
sakal

बोलून बातमी शोधा

म्हणून अजित पवारांनी घेतला यु टर्न आणि पुन्हा...

आज होणाऱ्या कार्यक्रमासाठी विरोधीपक्षाला निमंत्रित केलं गेलं नव्हतं. त्याचसोबत आंबेडकरी नेते प्रकाश आंबेडकर यांनाही आमंत्रण नव्हतं

म्हणून अजित पवारांनी घेतला यु टर्न आणि पुन्हा...

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडणार होता. मात्र सकाळपासूनच या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आणि त्याच्या निमंत्रणावरुन वाद निर्माण झाला होता. यानंतर आधी MMRDA आणि नंतर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती देत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट केलं. 

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार होते. मात्र कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने अजित पवारांना यु टर्न घ्यावा लागलाय. खरंतर अजित पवार हे पुण्यात होते. या समारंभासाठी अजित पवार पुण्यातून मुंबईत येत होते. खास या समारंभासाठी अजित पवार यांनी इतर सर्व कार्यक्रम पुढे ढकलून किंवा रद्द करून ते मुंबईत येत होते. मात्र सर्व वादानंतर मुख्यमंत्र्यांनी हा समारंभ पुढे ढकलला आणि मुंबईच्या वेशीपर्यंत म्हणजेच वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजित पवारांना यू टर्न घ्यावा लागला. अजित पवार वाशीवरून पुन्हा पुण्याकडे परातलेत.     

महत्त्वाची बातमी - पुढे ढकलण्यात आलेल्या इंदू मिल येथील पायाभरणी समारंभाबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात...

आज होणाऱ्या कार्यक्रमासाठी विरोधीपक्षाला निमंत्रित केलं गेलं नव्हतं. त्याचसोबत आंबेडकरी नेते प्रकाश आंबेडकर यांनाही आमंत्रण नव्हतं. बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांना देखील सकाळी MMRDA कडून ऐनवेळी निमंत्रण देण्यात आलेलं. मिळालेल्या माहितीनुसार स्वतः अजित पवारांनाही ऐनवेळी निमंत्रण मिळालं होतं अशी चर्चा आहे. त्यामुळे अजित पवारांनी ११ नंतरचे सर्व कार्यक्रम रद्द कडून मुंबईकडे कूच केलेली. मात्र कार्यक्रम रद्द करून अजित पवारांना यु टर्न घेऊन वाशीवरून पुण्याला परतावं लागलंय. 

ajit pawar took u turn and returned back to pune after indu mill program was postponed