पुढे ढकलण्यात आलेल्या इंदू मिल येथील पायाभरणी समारंभाबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात...

विनोद राऊत
Friday, 18 September 2020

कुणीही राजकारण राजकारण करू नये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मुंबई : इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले.

 

 

मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरवल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश मी दिले आहेत. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

chief minister uddhav thackeray on postponed program at indu mill dr babasaheb ambedkar memorial


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chief minister uddhav thackeray on postponed program at indu mill dr babasaheb ambedkar memorial