esakal | अधिवेशनाच्या तोंडावरच अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज

बोलून बातमी शोधा

ajit pawar}

यामुळे सरकार पडणार असल्याचं वारंवार भाष्य करणाऱ्या विरोधकांसमोरच हे एक आव्हानचं असणार आहे.

अधिवेशनाच्या तोंडावरच अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना मोठं चॅलेंज दिलं आहे. यामुळे सरकार पडणार असल्याचं वारंवार भाष्य करणाऱ्या विरोधकांसमोरच हे एक आव्हानचं असणार आहे. 

संजय राठोड प्रकरणावर मुख्यमंत्री पहिल्यांदा बोलले; 'गलिच्छ राजकारण'

सरकारचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही, त्यामुळे सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टाळत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पत्रकारांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी विरोधकांना थेट आव्हानचं दिलं. ते म्हणाले, "फडणवीसांना खरंच असं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव दाखल करावा. आम्ही दाखवून देऊ की किती आमदार सरकारसोबत आहेत आणि किती आमदार त्यांच्यासोबत आहेत"

फडणवीसांच्या सल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचा टोला; मोदी सरकारलाही केलं लक्ष्य

फडणवीसांनी फुकटचा सल्ला देऊ नये - मुख्यमंत्री

दरम्यान, पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "खोटं बोलून सत्तेत आले म्हणून, तुमच्याही सरकारची नोंद होणार आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावं. आपली सत्ता नाही म्हणून, महाराष्ट्राची बदनामी करू नये. विरोधकांनी आरोप करताना जबाबदारीनं वागावं. सीमाप्रश्नी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नये कारण केंद्रात आणि कर्नाटकात त्यांचंच सरकार आहे."