गणेश नाईकांच्या मैदानात खुद्द अजित पवार सेट करणार फिल्डिंग..

गणेश नाईकांच्या मैदानात खुद्द अजित पवार सेट करणार फिल्डिंग..

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार नवी मुंबईत येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकेकाळचे निष्ठावंत नाईक कुटुंब, राज्यातील सत्तापालट आणि महापालिका निवडणुका या धर्तीवर अजित पवार त्यांच्या भाषणात काय बोलतील याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यांच्या भाषणासोबत महाविकास आघाडीची घोषणाही होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मंगळवारचा महाविकास आघाडीचा मेळावा महापालिका निवडणुकांतील राजकीय समीकरणांना वेगळी दिशा देणारा ठरणारा आहे.

महाविकास आघाडीच्या त्रिसूत्रीमुळे राज्यात सत्ता आणण्यात यश मिळाल्यानंतर आता एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग केला जाणार आहे. मंगळवारी (ता.४) वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात महाविकास आघाडीतर्फे महापालिकेची निवडणूक लढवली जाणार असल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे आदी उपस्थित राहणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतरही सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी  शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपला रोखण्यासाठी विधानसभेप्रमाणे हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे सूत्र राबवण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे शिवसेनेचे नेतेही सकारात्मक आहेत.

आमदार गणेश नाईक राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्यामुळे नवी मुंबई महापालिकेत इतर पक्षांच्या तुलनेत भाजपचे पारडे जड झाले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईत भाजपचे दोन आमदार असल्यामुळे या तिन्ही पक्षांपेक्षा भाजपकडे जनाधार आहे. मात्र भाजपशी दोन हात करून मागील २० वर्षांतील नाईकांची सत्ता पायउतार करायची असेल तर तिन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. याची कल्पना तिन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांना आहे. 

मागील दोन महिन्यांपासून महाविकास आघाडीचे समीकरण नवी मुंबईत होण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेऊन प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक सोपवली आहे. शिवसेनेतर्फे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर, विरोधी पक्षनेते विजय चौगुले; तर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश सचिव संतोष शेट्टी या दोघांच्या खांद्यावर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. 

ajit pawars visit to navi mumbai will be very essential from upcoming elections perspective

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com