esakal | 'त्या' वक्तव्यानंतर अरविंद सावंत यांनी काढली आशिष शेलार यांची लायकी, म्हणालेत..
sakal

बोलून बातमी शोधा

'त्या' वक्तव्यानंतर अरविंद सावंत यांनी काढली आशिष शेलार यांची लायकी, म्हणालेत..

'त्या' वक्तव्यानंतर अरविंद सावंत यांनी काढली आशिष शेलार यांची लायकी, म्हणालेत..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - सामनाचे संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत महाराष्ट्रात “नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही” असं म्हटलंय. यावर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरवात झालीये. भाजपच्या गोटातून मोठ्या प्रमाणात या वक्तव्याच्या विरोधात प्रतिक्रिया येतायत. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका केलीये.

आशिष शेलार मुंबईतील नालासोपाऱ्यात एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विधानावर टीका करताना, “हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे, अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?” या एकेरी शब्दात त्यानी टीका केलीये.

मोठी बातमी - नवी मुंबईतील मातब्बर नेत्यांना झटका; वाचा नेमकं काय झालं!

आशिष शेलार यांनी महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दात केलेल्या टीकेवर मोठ्याप्रमाणात रोष व्यक्त केला जातोय. यावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी पलटवार केलाय. आशिष शेलार यांच्या टीकेवर उत्तर देताना अरविंद सावंत म्हणालेत, "सत्ता गेल्याने पाण्याबाहेर मासा कसा तडफडतो, तशी तडफड सध्या शेलारांनी सुरु आहे. आम्हाला ठाऊक आहे, हे आमच्या बापाचं राज्य नाहीये, पण ते तुमच्या बापाचं नाही."

मोठी बातमी - फेसबुकवर झाली त्यांची ओळख; तिने त्याला आकांत बुडवलं...

"बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या राज्याचे विश्वस्थ आहोत आणि याची जाण आम्हाला आहे. माणसाने कोणती भाषा वापरली यावरून त्याची भाषा समजते, त्यामुळे त्यांची लायकी काय? हे आता जनतेने समजून घेतली पाहिजे. जी भाषा आशिष शेलार वापरतायत, ती भाषा त्यांची लायकी दाखवून देतेय. पार्टी विथ डिफरंन्सचा डिफरंन्स आता लोकांना दिसायला लागलाय." असं अरविंद सावंत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय. 


मोठी बातमी - अडीच लाख विद्यार्थ्यांची तपासणी... नक्‍की कसली आहे ही तपासणी आणि का केली?

दरम्यान आशिष शेलार यांच्या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होतेय. आशिष शेलार यांनी माफी मागावी अशी देखील मागणी केली जातेय. आता आशिष शेलार आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

shivsena leader arvind sawant on controversial statement of ashish shelar