दर्या राजा मान ह्यो तुझा दरवर्षाचा... नारळीपुनवचा...घे सांभाळून घे लेकरांना...

महेंद्र दुसार
Monday, 3 August 2020

निसर्ग चक्रीवादळ, कोरोनासारखी संकटे दूर कर', असे साकडे घालत रायगडमधील कोळी बांधवांनी नारळीपौर्णिमेचा सण अगदी साधेपणात साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करता गावपंचाच्या उपस्थितीत समुद्राला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला.

अलिबाग: 'निसर्ग चक्रीवादळ, कोरोनासारखी संकटे दूर कर', असे साकडे घालत रायगडमधील कोळी बांधवांनी नारळीपौर्णिमेचा सण अगदी साधेपणात साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करता गावपंचाच्या उपस्थितीत समुद्राला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला.

पोलिस तपास राजकीय पाठिंब्यावर नाही, तर पुराव्यांवर चालतो! सुशांतसिंग प्रकरणी 'त्यांनी' व्यक्त केले मत...

अलिबाग कोळीवाड्यातील मानाचा नारळ कोळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चिंतामण भगत यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. नेहमीप्रमाणे नारळीपौर्णिमेचा थाट, नाचगाणी, फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी पोषक, असा कोणताही प्रकार या वेळी पाहावयास मिळाला नाही. काही मोजकीच मंडळी या वेळी उपस्थित होती. अशाच प्रकारे मोरा, मांडवा, वरसोली, मुरूड, जीवनाबंदर येथील कोळीबांधवानी सोनेरी मुलामा दिलेला नारळ समुद्राला सायंकाळी अर्पण केला. 

डोंबिवली पुन्हा एकदा हादरली कंपनीमध्ये स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली

समुद्राकाठी राहणार्‍या आणि प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी बांधवांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात; तसेच समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी नारळ अर्पण करून दर्या राजाची पूजा करतात. मात्र, सध्या कोरोना साथीमुळे जिल्ह्यात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी न करता   साधेपणात करण्यात आली.

-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ake away corona-like calamities of nature' The river of the Koli brothers in Raigad flows to the king; Celebrate Narlipurnima in simplicity