

Alibaug Crime
ESakal
अलिबाग : तालुक्यातील सारळ येथील एका उच्चभ्रू वसाहतीत अमली पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री व सेवन सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी रविवारी (ता. १४) पहाटे या ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत गांजा सेवन करणाऱ्या दोन ज्येष्ठ नागरिकांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईत बेकायदा वास्तव्यास असलेल्या एका युक्रेनियन महिलेलाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मांडवा सागरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.