झक्कास! उठा उठा... मुंबईकर, ९ वाजले दुकानं उघडण्याची वेळ झाली

पूजा विचारे
Wednesday, 5 August 2020

आजपासून सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. मुंबई महापालिकेनं याबाबतचं परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे. 

मुंबईः आजपासून सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. गेली 5 महिने मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यात आजपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनमध्ये सम-विषम तत्त्वावर दुकाने सुरू होती. मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. मुंबई महापालिकेनं याबाबतचं परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे. 

अनलॉकच्या निर्णयाची अंमलबजावणी सरकारने सुरु केली असून मुंबईची सर्वच दुकानं आजपासून सुरु होणारेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन लावल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध लादले होते. 

यात  मद्यविक्रीच्या दुकानांचाही यात समावेश आहे. मद्य घरपोच देता येण्याची सुविधाही देण्यात आलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा महापालिकेनं दिलाय.

हेही वाचाः  अखेर त्या वाईट निर्णयाची वेळ आलीच! मुंबईत आजपासून पाणीकपातीचे नियोजन... वाचा सविस्तर

मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधली दुकानंही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु असतील. मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास  परवानगी नसून होम डिलीव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटला किचन सुरु ठेवता येणार आहे.

अधिक वाचाः  BKC च्या पंपिंग स्टेशनवरुन शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा टक्कर! कलानगरला झुकते माप देत असल्याचा भाजपचा आरोप

आजपासून सर्व अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार आहेत. सर्व अत्यावश्यक सेवेत न मोडणारे दुकानं, मार्केट यांनी परवानगी देण्यात आली आहे. सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु राहतील. सर्व ई-कॉमर्स कामांना परवानगी असून सध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्या सुरुच राहतील. तसंच सर्व बांधकाम कामांना देखील सरकारनं परवानगी दिली आहे.

all 7 days non essential shops mumbai open from today 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all 7 days non essential shops mumbai open from today