esakal | Mumbai : वरळी डेपोतून बेस्टच्या सर्व इलेक्‍ट्रीक बसेस धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

electric bus

Mumbai : वरळी डेपोतून बेस्टच्या सर्व इलेक्‍ट्रीक बसेस धावणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्टच्या वरळी डेपोतून लवकरच सर्वच्या सर्व इलेक्‍ट्रीक बसेस धावणार आहे. या डेपाच्या ताफ्यात 75 बसेस दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात उद्या 60 बसेस दाखल होणार आहे. त्याच बरोबर बेस्ट उपक्रम उद्या (ता.10) पासून मुंबई विमानतळावरुन मुंबईच्या विविध ठिकाणी जाणारी विशेष बस सेवाही सुरु करणार आहे.

येत्या सहा वर्षात 2027 पर्यंत बेस्टच्या सर्व बसेस इलेक्‍ट्रीक असतील. सध्या बेस्टच्या ताफ्यात 366 इलेक्‍ट्रीक बसेस असून त्यातील 360 बसेस भाडे तत्वावरील आहेत. तर,भविष्यात सर्वच्या सर्व 10 हजार बसेस या ईलेक्‍ट्रीकच्या करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.

वरळी डेपोतून धावणाऱ्या सर्व बसेस ईलेक्‍ट्रीकच्या असतील.त्यासाठी 75 बसेसचे नियोजन करण्यात आले असून त्यातील 60 बसेस उद्या ताफ्यात दाखल होणार आहेत.असे बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी सांगितले.रविवारी (ता.10) रोजी या बसेससह 10 चार्जिग पॉईंटचे उदघाटन पर्यावरण व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबई विमानतळावरून पाइंट टू पॉइंट सेवा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई शहराच्या विविध भागात थेट बस सेवा सुरु केली जाणार आहे.ही पॉईंट टू पॉईंट सुविधा असेल.त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होऊ शकेल.या सुविधेचेही उद्या उदघाटन होणार आहे.तसेच ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी आयोजित उपक्रमातील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यातही येणार आहे.

loading image
go to top