

Mumbai Water Supply Issue
ESakal
मुंबई : उंच आणि सखल भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यावाचून मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. पाण्याच्या वितरण व्यवस्थेवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार प्रहार करीत स्थायी समितीत पाण्यासाठी आज आक्रोश केल्याचे दिसले. प्रशासक राजवटीत बोलता येत नव्हते. आज नगरसेवकांनी पाण्यासाठी प्रशासनाला थेट जबाबदार धरले. जल अभियंत्यासोबत लवकरच बैठक बोलावून पाणीप्रश्न सोडवू, अशी ग्वाही स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी बैठकीत दिली.