ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार; पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

तुषार सोनवणे
Friday, 20 November 2020

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. परंतु हे निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंदच राहतील अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई - राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. परंतु हे निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंदच राहतील अशी माहिती समोर आली आहे.

शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा सावळा गोंधळ; नियोजनाअभावी कल्याण-डोंबिवलीत तारांबळ

राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या ठाणे प्रशासनाच्या बैठकीत ठाण्यातील शाळा उघडाव्यात की नाही याबबात चर्चा झाली. नुकतेच मुंबई महापालिकेने पालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबर पर्यंत बंदच राहतील असा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे बाबत काय निर्णय घेतला जातो. याकडे ठाणेकरांचे लक्ष लागून राहिले होते. ठाणे जिल्ह्यातील शाळा देखील 31 डिसेंबर पर्यंत बंद राहतील असा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पालकमंत्र्यांनी घेतला आहे. ठाणे  जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रांमध्येही हा निर्णय लागू असणार आहे.

All schools in Thane will remain closed till December 31 Decision of the Guardian Minister and Collector


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All schools in Thane will remain closed till December 31 Decision of the Guardian Minister and Collector