esakal | आजपासून तुमचा EMI होणार कमी, वाचा बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून तुमचा EMI होणार कमी, वाचा बातमी

आजपासून तुमचा EMI होणार कमी, वाचा बातमी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कर्जदारांसंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. कारण आता तुमचा EMI कमी होणार आहे. SBI आणि बँक ऑफ बडोदा या बँकांसोबतच आणखी काही बँकांनी MCLR रेटमध्ये कपात केलीये. यामुळे तुम्हाला आता याचा फायदा होऊन तुमचा EMI आता कमी होणार आहे.

MCLR म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट. बँकांनी या रेटच्या दरांमध्ये 0.05 टक्के कपात केली आहे. त्यामुळे आता होम लोन किंवा वाहन लोन यांच्यावरील EMI कमी होणार आहेत.  

मोठी बातमी - चोरीऐवजी घरातील उंची दारू प्यायला आणि चोराला सोफ्यावर लागली झोप, मग...
 

दरम्यान आजपासूनच तुमचा emi कमी होणार आहे कारण कमी केलेला MCLR आजपासून लागू होणार आहेत. सर्व मॅच्युरिटी पीरिअडसाठी सध्याचा व्याजदर कमी करण्यात येणार आहे. तशी माहिती बँकेकडून BSE ला देण्यात आली आहे. 

मोठी बातमी - नव्या आदेशांमुळे वोडाफोन-आयडिया लवकरच बंद होणार ?
 

या आधी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आणि बँक ऑफ बडोदा म्हणजेच BOB ने MCLR दरांमध्ये  कपात केली होती. या पाठोपाठ आता अलाहाबाद बँकेने देखील MCLR दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. एका वर्षाचा मॅच्युरिटी पीरिअड असणाऱ्या कर्जाचा MCLR आता 8.30 टक्क्यांवरून 8.25 होणार आहे. तर  एक दिवस, तीन महिने आणि सहा महिन्यांचा कालावधी असणाऱ्या कर्जाचा MCLR कमी होऊन 7.75 ते 8.10 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

allahabad bank decides to reduce MCLR by point five percent emi will be reduced

loading image
go to top