चोरीऐवजी घरातील उंची दारू प्यायला आणि चोराला सोफ्यावर लागली झोप, मग...
मुंबई - मुंबईत कधी, कुठे काय होईल याचा काहीच नेम नाही. आता चोरी करायला आलेला चोर ज्या घरात चोरी करायचीय तिथेच झोपलेला तुम्ही कधी ऐकलंय का हो ? नाही ना... पण अशीच घटना मुंबईत घडलीये.
संजीव वर्मा नामक एक चोर मुंबईतील एका उद्योगपतीच्या घरात चोरी करायला घुसला खरा, मात्र त्याला घरातील उंची दारूने भुरळ पाडली. चोरी करायच्या आधी दोन पेग मारू असा विचार त्याने केला आणि सुरु झाला... म्हणता म्हणता या पट्ठ्याने एक दारू ची बाटली संपवली, दुसरी पण बाटली फोडली आणि दारू पीत होता. मात्र दारू पितापिता त्याचा टांगा पलटी झाला. आपण कुठे आहोत, काय करतोय याचं काहीही भान त्याला राहिलं नाही. आपलं सामान गोळा करून पळ काढण्याच्या ऐवजी तो तिथल्याच सोफ्यावर झोपून गेला.
मोठी बातमी - अशोक चव्हाण म्हणतात बाळासाहेब थोरातांना हटवा, सोनिया गांधीकडे तक्रार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीत, संजीव वर्मा हा १९ वर्षीय मुंबईतील रहिवासी आहे. त्याने मारिन ड्राईव्ह भागातील गिरीकुंज बिल्डींमधील तिसऱ्या मजल्यावरील उद्योगपती सिद्धांत साबू यांच्या घरात बुधवारी चोरी करायचा प्रयत्न केला. साबू नुकतेच 'या' नवीन घरात शिफ्टि होत असल्याने घरात फारसं सामान नव्हतं. गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास, घरातील लाईट सुरु कसा पाहून काही जवळच्या माणसांना घेऊन साबू आपल्या घरी पोहिचलेत. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी सेक्युरिटी अलार्म वाजवत मदत मागितली.
मोठी बातमी - इथे आहे, सूर्याजी मालुसरे यांचे समाधिस्थळ...पाहा कसे आहे....
आतमध्ये संजीव वर्मा हा भुरटा चोर त्यांच्या सोफ्यावर पडलेला त्यांना पाहायला मिळाला. त्यांच्या बाजूला तएक चाकू देखील होता. कचऱ्याच्या डब्ब्यात एक रिकामी दारू ची बाटली आणि फ्रिजमध्ये एक अर्धी संपलेली दारूची बाटली त्यांना आढळली. साबू यांना सर्व प्रकार तात्काळ लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केलं.
घरातच पंचनामा करताना वर्माने बाल्कनीमधून घरात घुसल्याच सांगितलंय, त्याने एक कपाट देखील फोडलं, यानंतर फ्रिज उघडून त्यातील दोन शॅम्पेनच्या बाटल्यांवर ताव मारला. वर्मा पळून जाण्याच्या तयारीत असताना जास्त दारू प्यायल्याने तिथेच त्याला झोप आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. साबू यांच्या घरातून तीन बुटांचे जोड हरवले असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र पोलिसांना या भुरट्या चोरांकडून हे बुटांचे जोड मिळालेले नाहीत.
मोठी बातमी - नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, वाचा...
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४५४, ४५७, ३८० आणि ४२७ अन्वये गुन्ह्याची नोंद केलीये. कोर्टात हजर केल्यानंतर या भुरट्या चोराने फक्त दारू प्यायल्याची कबुली दिली आहे, त्याने कोणतीही वस्तू चोरली नसल्याचं देखील म्हटलंय. या भुरट्या चोरोविरोधात अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये देखील नोंद आहे.
thief came for robbery but settles for campaign at marin drive mumbai