esakal | गुगलचं नवीन भन्नाट फिचर; आता गुगलवर जाणून घ्या कोरोना हॉटस्पॉटची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

गुगलचं नवीन भन्नाट फिचर; आता गुगलवर जाणून घ्या कोरोना हॉटस्पॉटची माहिती

गुगल मॅपवर आता तुम्हाला आपल्या परिसरातील कोरोना हॉटस्पॉटची माहिती मिळणार आहे.

गुगलचं नवीन भन्नाट फिचर; आता गुगलवर जाणून घ्या कोरोना हॉटस्पॉटची माहिती

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई, ता. 28 : गुगल मॅपवर आता तुम्हाला आपल्या परिसरातील कोरोना हॉटस्पॉटची माहिती मिळणार आहे. तुम्ही जात असलेल्या परिसऱात कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे हे गुगल सांगणार आहे. कोरोना बाबत इत्तंभूत माहिती द्यायला गुगल मॅपने नवं फिचर सुरू केले आहे.

जगभरातील सर्वच ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे कामासाठी अनेकजण घराबाहेए बाहेर पडत आहोत. मात्र अनेकदा आपण ज्या भागात जातोय तिथल्या कोरोना स्थितीबाबत आपल्याला काहीही माहिती नसते. अशाच एखाद्याला कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी गुगल मॅपने नवी संकल्पना विकसीत करत कोरोना हॉटस्पॉटची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध केली आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती

गुगल मॅप ऍपच्या वरच्या बाजूला असलेल्या Covid19 या पर्यायावर क्लिक केल्यावर एक लाख लोकसंख्येमागे किती रूग्ण विशिष्ट भागात आहेत याची माहिती मिळेल. यासह विशिष्ट भागात  किती रूग्ण वाढले किती कमी झाले ही माहिती ही मिळेल. युजर्सपर्यंत सर्व माहिती पोचवण्यासाठी काही महत्वाच्या स्त्रोतांसह जागतिक आरोग्य संघटनेकडून माहिती मिळवण्यात आली आहे.    

कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात ही गुगल मॅपने काही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. गुगल मॅपने आधी कोरोना साथीच्या संदर्भातील माहिती देणारी टूल्स उपलब्ध करून दिली आहेत. त्यात कुठल्या भागात गर्दी आहे हे समजतं. याशिवाय लॉक़डाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा कुठे उपलब्ध होतील याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. शिवाय शासकीय यंत्रणेने उपलब्ध करून दिलेली भोजन तसेच निवास व्यवस्थेची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचे काम या काळात करण्यात आले.

amazing feature of google now get covid hotspot details on google

loading image
go to top