

Ambadas Danve Viral Video
esakal
Currency Bundle Video : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत राज्यात नवी राजकीय खेळी चर्चेत आणली आहे. शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांच्या बंडल मोजतानाचा एक व्हिडीओ व्हायरल दानवेंनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला. सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, मग इतके पैसे कुठून आले, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. यावर ज्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.