

Ambarnath Fuel Panic Leads to Bike Blaze
Esakal
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झालंय. भारतातही इंधन पुरवठ्यावर परिणामाची शक्यता आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही असं सरकारने सांगितल्यानंतरही नागरिकांकडून पेट्रोल पंपावर गर्दी केली जात आहे. पेट्रोल तुटवड्याच्या अफवेमुळं नागरिक पेट्रोल, डिझेलने टाकी फुल करत आहेत. एका दुचाकी धारकाला टाकी फुल करणं महागात पडलं आहे. टाकी फुल केल्यानंतर गाडीलाच आग लागली आणि दुचाकी जळून खाक झाली आहे.